बहारीन – इराणने भारताला मोठा झटका दिला असून एका प्रकल्पातून इराणने भारताला बाहेर काढलं असून आता हा प्रकल्प इराणने स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढलं आहे.
तेहराण : इराणने भारताला मोठा झटका दिला असून एका प्रकल्पातून इराणने भारताला बाहेर काढलं असून आता हा प्रकल्प इराणने स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढलं आहे.
गेल्या आठवड्यात इराणचे वाहतूक आणि शहर विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांच्या हस्ते ६२८ किमी लांबीच्या चाबहार-जाहेदान रेल्वे मार्ग प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं असून कामास सुरुवात करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकल्प मार्च २००२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.







