धरणगाव (प्रा.पी.एम.पाटील) येथिल कोविड सेंटरला पंधरा रुग्ण बरे होवुन घरी परतले त्यांचे स्वागत करण्यात आले. येथिल कोविड सेंटर ला आज दि 15 जुलै रोजी पंधरा रुग्णांनी करोना वर मात करुन त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.त्या सर्वांचे पेढा देवुन व टाळ्या वाजवुन स्वागत करण्यात आले. त्यामधे पाळधी – 9, बाभोंरी बु.-4, धरणगाव – 2 असे एकुण पंधरा रुग्ण होते. पाळधी बु. येथील रुग्ण नाशिर बशीर पिंजारी यांनी धरणगाव कोविंड सेंटर ला अत्यंत चांगली सुविधा मिळत असल्याचे बोलतांना सांगुन समाधान व्यक्त केले.
या रुग्णांमधे हितेश विनोद पाटील रा बाभोंरी बु. या 4 (चार) वर्षाचा रुग्णाने कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्याचे शासकीय समन्वय समिति अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख जळगांव गुलाबराव वाघ तसेच नगराध्यक्ष निलेश चौधरी व तहसिलदार नितीन कुमार देवरे यांनी त्याचे पेढा देवुन कौतुक केले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा शासकीय समन्वय समिति अध्यक्ष गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व तहसिलदार नितिनकुमार देवरे, बी बियाणे चे मोठे व्यापारी किशोर डेडिया व सुनिल मालु हे मदत व सहकार्य करण्यासाठी हजर होते.
कोविड सेंटर ची सक्षमपणे जबाबदारी सांभाळणारे नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांनी चोख व्यवस्था ठेवली होती, यावेळी धरणगांव मंडळ अधिकारी वनराज पाटील , तलाठी अनिल सुरवाडे ,कोतवाल तबरेज खाटीक , अरविंद चौधरी, गोपाल पाटील, गोपाल चौधरी आदी उपस्थित होते.







