बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) – भारतीय डाकघर औरंगाबाद विभाग यांच्या वतीने बाजार सावंगी तालुका खुलताबाद येथील डाकघर कार्यालयात गुरुवार (ता. 28) रोजी ग्राहक व नागरिकांसाठी पोस्टाच्या विविध योजनांची माहिती देणे व अंमल बजावणीसाठी जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी जिल्हा कार्यालयाचे प्रवर अधीक्षक सी.वा नागराजू निरीक्षक श्री मेनन वरिष्ठ व्यवस्थापक श्री कुलकर्णी यांची उपस्थित राहून मार्गदर्शन लाभणार आहे. सर्वसामान्यांसाठी पोस्टल व ग्रामीण टपाल विमा, जन सुरक्षा विमा, आय पी पी बी बचत खाते, पोस्टमन द्वारा मोबाईल वरून पैशांची देवाण-घेवाण, सुकन्या समृद्धी योजना, सेवानिवृत्ती धारकांसाठी ज्येष्ठ नागरिक खाते, मासिक प्राप्ति योजना, पब्लिक प्राव्हिडंट फंड, राष्ट्रीय बचत पत्र यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात येईल
नव्याने समाविष्ट झालेले पोस्टाद्वारे नवीन आधार कार्ड काढणे त्यात दुरुस्ती करणे यासंबंधी ही माहिती देण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त ग्राहक, अल्पबचत प्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपडाकघर मास्तर पाराजी जाधव यांनी केले आहे.







