“एक झाड कोरोना योद्धयांसाठी’ उपक्रमाचे आयोजन”

one-tree-for-corona-warrior

मुंबई (प्रतिनिधीलक्ष्मण राजे) – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सलाम मुंबई फाउंडेशन, नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन आणि रॉबिन हुड अकॅडमीद्वारे ‘एक झाड कोरोनायोद्धयांसाठी’या अॅकेडमी ग्रीन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रम मुंबईतील २६ मनपा शाळा,३ जिल्हा परिषद शाळा, ३ पोलीस ग्राउंड आणि २ मनपा कार्यालयांच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता.

२३ ते २६ जानेवारी ह्या दिवसांत आयोजकांद्वारे एकूण ३०० वृक्षारोपण करण्यात आले. ह्यात प्रामुख्याने भारतीय झाडांचा समावेश करण्यात आलेला आहे. उपक्रमात मनपा शाळेचे शिक्षक आणि अधिकारी सहभागी झाले होते. ह्याप्रसंगी आपल्याही परिसरात भारतीय वृक्ष लावण्याची, त्यांना जगविण्याची, आपला परिसर स्वच्छ आणि रोगमुक्त/सुंदर ठेवण्याची शपथ देण्यात आली. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या मुंबईच्या दक्षिण विभागातील ७५ क्लीनअप मार्शल्सचा सन्मान चिन्ह देऊन आयोजक संस्थांद्वारे सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या वेळी सलाम मुंबई फाउंडेशनचे मानव संसाधन उप प्रबंधन व्यवस्थापक म्हणाले की सध्या संपूर्ण जगच कोरोना महामारीच्या कचाट्यात सापडले आहे, तरीही जीवावर उदार होऊन ‘कोरोनायोद्धे’ माणुसकी जपण्याचे कार्य करीत आहेत आणि आपल्याला प्रेरणा देत आहेत. कोरोनायोद्ध्यांना सलाम करण्यासाठी, कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी, आपली पृथ्वीमाता सुदैव सुंदर आणि हिरवीगार रहावी ह्यासाठी आम्ही तीन संस्था मिळून ‘एक झाड कोरोना योद्धयांसाठी’ आणि अकॅडमी ग्रीन हा उपक्रम राबवीत आहोत. अशा समाजोपयोगी उपक्रमांत आम्हाला मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांचा सदैव पाठिंबा मिळत असतो आणि संस्थेला ही असे जनहित उपक्रम आयोजित करण्यात आवडतील असे देखील संस्थे द्वारे सांगण्यात आले.अशी माहिती शुभम पेडामकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here