धरणगाव प्रभारी नगराध्यक्षपदी सौ कल्पना महाजन

gulabrao-wagh

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगांव न.पा.चे. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी सुट्टीवर जात असून त्यांनी आपला पदभार उपनगराध्यक्षा सौ कल्पना विलास महाजन यांना सोपवित असून त्याचा धरणगांव न.पा.मध्ये पदभार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,राष्ट्रीय चर्मकार समाजाचे भानुदास अप्पा विसावे,माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी,माळी समाजचे अध्यक्ष विठ्ठल महाजन,रामकृष्ण महाजन,धानोरा सरपंच भगवान महाजन, राजेंद्र ठाकरे,नगराध्यक्ष नीलेश चौधरी,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,गटनेते पप्पू भावे आदी उपस्थित होते.kalpanatai-mahajan

धरणगाव न.पा.मध्ये चित्रकला स्पर्धेत सुद्धा गुलाबराव वाघ यांचा हस्ते उद् घाटन झाले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे चित्रकला स्पर्धेत उपस्थित होते.या प्रसंगी गुलाबराव वाघ,पी एम पाटील सर,सुरेश चौधरी आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलीत आभार प्रदर्शन निलेश चौधरी यांनी मानले तर सूत्रसंचलन विनोद रोकडे यांनी केले. कार्यक्रमामध्ये धरणगाव शहरातील सर्व नगरसेवक कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here