वर्धा (जिल्हा प्रतिनिधी रिकेश जुमडे) – दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवार दिनांक 26/1/2021 रोजी सकाळी ८.०० वाजता मुक्ताबाई विद्यालय व कनिस्ट महाविद्यालय, समुदपूर जि. वर्धा येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम नियोजित वेळेवर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घोडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाला.
यावेळी विद्यालयाचे कला शिक्षक -मनोज बाचले यांनी विद्यार्थ्यांना फलक लेखनातून शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक यांनी श्रीराम येणूरकर सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन केले. माध्यमिक शिक्षक, सहा.शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.





