युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यतर्फे सिंधुताई सपकाळ यांचा जाहीर सत्कार

sindhutai-sapkal

पुणे (प्रतिनिधी संतोष सावंत) – येथील युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कार्याध्यक्ष अस्मिताताई जाधव, महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष भोसकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष सावंत हे उपस्थित होते. त्यावेळी सिंधुताई ताई सपकाळ माई यांनी युवा पत्रकार संघाचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पत्रकारितेमुळे मला मिडीयाने खूप प्रसिध्दी दिली. आतापर्यंत माझ्या कार्याचा भारतभर प्रसार झाला तो फक्त मीडियामुळे झाला. त्यानंतर सिंधुताई सपकाळ यांना युवा पत्रकार संघाची थोडक्यात माहिती सांगण्यात आली व त्यांनी युवा पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here