दिवस वर्धापनदिनाचा, सन्मान कार्यकर्तृत्वाचा

purogami-patrakar-sangh-maharashtra

खोपोली (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – दिवस वर्धापनदिनाचा, सन्मान कार्यकर्तृत्वाचा महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचा वर्धापण दिन रविवार 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महाराजा लॉन्स खोपोली येथे संपन्न होणार आहे

महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघांचा वर्धापण म्हणजे माझा,आपल्या सगळ्यांच्या पत्रकारितेचा आणि सामाजिक कार्याचा केलेला सन्मान आहे.या वर्धापण दिनी आयुष्यात आजवर केलेली मेहनत,निष्ठा आणि प्रामाणिक पणाबद्दल अभिमान वाटतो.हा माझ्या एकट्याचा नसून आपल्या सर्वांचाच गौरव आहे.

वर्धापण दिन मला नेहमीच माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहिल.हा माझ्या आयुष्यातील विशेष भाग्याचा दिवस आहे.”महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या” माध्यमातून घेतलेला समाजसेवेचा हा वसा तुमच्या सोबत पूर्णत्वास नेतो याची खात्री देतो.हा वर्धापण दिन “महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघा “ला उर्जा, प्रेरणा व प्रोत्साहन देणार आहे.असेच प्रेम आणि लोभ ठेवावा.

सालाबाद प्रमाणे या वर्धापण दिनी महाराष्ट्रातून सामाजिक बांधिलकी जपत समाजात सक्रिय असणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वे सन्मानित केली जाणार आहेत.यासाठी महाराष्ट्रातील कला ,क्रिडा, शेती ,उद्योग, माजी सैनिक ,प्रशासनातील कर्तृत्ववान अधिकारी , पत्रकार ,समाजउपयोगी कार्यरत असणाऱ्या संस्था ,डाॕक्टर ,वकील ,ईंजिनीयर ,आय टी सेक्टर या व अशा विविध क्षेत्रात नेत्रदिपक ,कामगिरी केलेल्या सन्माननीय व्यक्तींचा विशेष सन्मान केला जाणार आहे. त्यासाठी आपण आपल्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा व माहिती पाठवावी…

अधिक माहितीसाठी पुरोगामी पत्रकार संघाचे उपसचिव प्रशांत भोईर +919372494328, संघाचे राज्य संपर्कप्रमुख सतिष पेडणेकर +918850225573, राज्य प्रसिद्धीप्रमुख अमरसिंह राजपूत +919850304430 यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here