विवाहित प्रेयसीला मारुन प्रियकराने नव्या घरातच मृतदेह पुरला

dead-body

खरगोन (मध्य प्रदेश) – खरगोनमध्ये खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह नवीन घरात पुरला. मृतदेह पुरलेल्या ठिकाणी सिमेंटने प्लास्टर केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, छायाबाई ही काही दिवसांपूर्वी मोहनखेडी गावात आपले वडील भायराम यांच्याकडे आली होती. मात्र, ३० डिसेंबरपासून ती अचानक बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर ३ जानेवारी २०२१ रोजी कुटुंबीयांनी भीकनगाव पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

महिला बेपत्ता झाल्यानंतर तिचा प्रियकर संतोष हा देखील गावातून बेपत्ता झाला होता. दोघेही गाव सोडून पळून गेल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. धक्कादायक म्हणजे संतोषचे वडीलही गावात नव्हते. छायाबाईला संतोषने त्याच्या नव्या घरात डांबल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांना आला. पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केली. पण त्यांची हाती काही लागले नाही. २६ जानेवारी रोजी संतोषच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचे टाळे तोडले आणि झडती घेतली. घरात काहीही नव्हते. एका ठिकाणी सिमेंटने प्लास्टर केलेले होते. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी खोदले. जवळपास ३ फूट खोदल्यानंतर छायाबाईचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here