शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी येथील मध्यवर्ती ठिकाणी अत्यंत दिमाखदार पद्धतीने बांधलेल्या अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवास्थानास भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे नाव दिल्याबद्दल शिर्डीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेने आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची स्मृतिचिन्ह देऊन तसेच भव्य सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
आ. विखे पाटील हे विविध विकासकामांच्या भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळ्यानिमित्त शिर्डी शहरात आले होते. या सर्व कार्यक्रमाची सांगता खंडोबा मंदिर येथे झालेल्या भव्य सभेने झाली. तेव्हा या ठिकाणी संस्थेच्या वतीने आ. विखे पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळेस शहरातील राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे नाव या वास्तुस मिळणे हे शहराच्या वैभवात भरच टाकणारे आहे. हे शिर्डी शहराच्या नागरिकांचे भाग्य आहे. असे आ. विखे पाटील म्हणाले. यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचेही यावेळी त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेमुदभाई सैय्यद, सरदार पठाण, शमसुद्दीन शेख, अश्रफ सैय्यद, दादाभाई इनामदार, जावेद शाह, मुख्तार सैय्यद, साजिद पठाण, अंसार सेख, नदीम सेख, जलील पठान,अनीस पठान,असिफ इनामदार, अरशद शाह,अखलाख खान, बरकत अली, मतीन सय्यद,आदिल पठाण आलिम तम्बोली, अयूब शाह, जावीद इनामदार,व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







