मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण.) – कृपा फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्र, पापडी, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात भारताचा तिरंगा फडकविण्याचा मान टोंनी पराईरा, कृपा फाउंडेशनचे केंद्र व्यवस्थापक तपन गोस्वामी यांना मिळाला.
या प्रसंगी सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील आणि मुंबई जिल्हा संघटक सौ. दिशा कंळबे व कृपा फाउंडेशनचे प्रतिनिधी शमित वेंद उपस्थित होते.
या वेळी कृपा फाउंडेशनचे प्रमुख पाहुणे टोनी पराईरा यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली व मिलिंद पाटील यांनी तंबाखू व तंबाखूचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले तर मुंबई जिल्हा संघटक सौ. दिशा कंळबे यांनी व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच पोस्टर प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले होते. भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.







