मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – कोरोनाकाळात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे तात्पुरती रद्द केलेली अहमदाबाद ते मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस पुन्हा १४ फे ब्रुवारीपासून सेवेत येणार आहे. ही गाडी आठवडय़ातून चारच दिवस धावणार आहे.
टाळेबंदीत लांब पल्ल्याच्या गाडय़ाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. सुरुवातीला फक्त श्रमिकांसाठी आणि त्यानंतर विशेष गाडय़ांची सेवा सुरू झाली. टाळेबंदी शिथिल होताच गेल्या १७ ऑक्टोबरपासून अहमदाबाद ते मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसही चालवण्यात आली. गुरुवार वगळता ही गाडी उर्वरित सहा दिवस प्रवाशांच्या सेवेत होती. तसेच अंधेरी स्थानकातही थांबा देण्यात आला होता. मात्र सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेऊनही तेजस एक्स्प्रेसची दररोज २५ ते ४० टक्केच तिकिटे आरक्षित होत होती. आयआरसीटीसीला मोठा तोटाही सहन करावा लागत होता. त्यामुळे २४ नोव्हेंबर २०२० पासून ही एक्स्प्रेस तात्पुरती रद्द करण्यात आली होती.
कोरोनाचे संक्रमण कमी झाले असून मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे इंडियन रेल्वे कॅटरिंग टूरिझम कॉपरेरेशनने (आयआरसीटीसी) तेजस एक्स्प्रेस १४ फे ब्रुवारीपासून पुन्हा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र मांक ८२९०१ आणि ८२९०२ तेजस एक्स्प्रेस शुक्र वार, शनिवार, रविवार, सोमवार धावणार आहे. त्याचे आरक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती आयआरसीटीसीने दिली आहे. मुंबई व अहमदाबाद दरम्यान नदियाड, वडोदरा, भरुच, सुरत, वापी, बोरीवली, अंधेरी स्थानकात या गाडीला थांबा आहे.







