टिकटॉकवर बोल्ड व्हिडीओ टाकल्याने संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या

revolver

ब्राझील – सोशल मीडियावर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या कंटेटमध्ये ‘बोल्ड कंटेट’ अधिक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत परदेशात बोल्ड कंटेट मोठ्या प्रमाणात तयार केला जातो. मात्र यावरून अनेकदा वाद वाढत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील बोल्ड कंटेट शेअर करण्यावरून घरगुती वाद झाल्याची प्रकरणे अधूनमधून समोर येऊ लागली आहेत.

ब्राझिलमध्ये एका व्यक्तीने पत्नीवर 14 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत:वर देखील गोळी चालवली याचे कारण समोर आले आहे. पत्नी बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असल्याने संतापलेल्या पतीने तिला गोळ्या घालून नंतर आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

35 वर्षाच्या एलेन फेरेरा सियोलीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह होती आणि ती तिचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा शेअर करायची. तिचा पती एलेजांद्रो एंटोनियो एग्युलेरा याला फेरेराचं असं वागणं बिलकूल आवडत नव्हतं.

स्थानिक रिपोर्टनुसार एंटोनियो आणि फेरेरा यांच्या एका टिकटॉक व्हिडीओवरून बरेच वाद झाले. त्यानंतर चिडलेल्या एंटोनियो याने फेरेरावर 14 गोळ्या झाडल्या. नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेवेळी त्यांची 6 वर्षांची मुलगी देखील तिथे उपस्थित होती.

या दोघांचा मृतदेह ब्राझिलच्या पोंता पोरा येथे एका घराच्या मागच्या भागात आढळले. फेरेराच्या शरीरावर 14 जखमा होत्या. तिचा उजवा हात देखील तुटला होता. तर पतीच्या डोक्यात गोळी लागलेली होती. त्यांच्या मुलीला आता त्याचे नातावाईक सांभाळत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांच्या मित्रमंडळींनी दिलेल्या माहितीत दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे ही बाब समोर आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी देखील ते भांडत असायचे, असे आजूबाजूचे लोक सांगतात. फेरेरा हिचे टिकटॉकवर 58 हजार फॉलोअर्स होते. ती आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here