भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा जळगाव शाखेच्या वतीने भुसावळ तालुक्यातील माध्यमिक विभागातून कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक योगेश गांधेले यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून केलेल्या कामाची दखल घेऊन, त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा सर्वोत्कृष्ट समजला जाणारा “गुणवंत शिक्षक पुरस्कार” राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने भुसावळ तालुक्यातील माध्यमिक विभागातून एकमेव गांधेले यांना बहाल करण्यात आला आहे.
राज्य समता शिक्षक परिषद आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील, उशिक्षणाधिकारी विजय पवार व मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संघटनेमार्फत तात्यासाहेब ज्योतिराव फुले स्मृती दिवस प्रित्यर्थ गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. मंगळवार(दि. २६) जानेवारी रोजी सदर पुरस्कार वितरण सोहळा डी. डी. एस. पी. कॉलेज, एरंडोल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. चालू वर्षी जिल्हाभरातून प्रत्येक तालुक्यातून एक असे प्राथमिक विभागातून १७ व माध्यमिक विभागातून २२ गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक व संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार धनराज मोतीराय सर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तात्यासाहेब ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डि.के. अहिरे, एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील, एरंडोल शहराचे नगराध्यक्ष रमेश अण्णा परदेशी, प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, जिल्हा परिषद जळगावचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, नगरसेवक अभिजीत पाटील, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, धरणगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, चोपडा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष सूर्यकांत गरुड, माध्यमिक विभागाचे राज्याध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ, विभागीय अध्यक्ष रावसाहेब जगताप , प्रोटॉन चे जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेराव, ओबीसी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सहसचिव बी. वाय. पाटील इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद आठवले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्यासाहेब सोनवणे, संघटनेचे सचिव गणेश बच्छाव यांनी केले. तसेच विविध सत्रांचे सादरीकरण संघटनेचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष बी. एन. पाटील, सौ.सपना रावलानी, सरिता वासवानी, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा सौ.छाया सोनवणे, संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण केदार, सरचिटणीस अजय भामरे, यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समिती सदस्य, मनोज ननवरे, उपाध्यक्ष प्रवीण केदार, प्रकाश तामस्वरे, सुनील चव्हाण, महेश पाटील, चिंतामण जाधव, महानगराध्यक्ष टी.बी. पांढरे, उपाध्यक्षा सौ. अश्विनी कोळी, उपाध्यक्ष गोविंदा वंजारी, कार्याध्यक्ष युवराज सोनवणे, उपाध्यक्ष हेमेंद्र सपकाळे, शंकर भामेरे, डी. बी. पाटील, राहुल सोनवणे, हिरालाल मोतीराळे, हेमकांत लोहार, गणेश सूर्यवंशी, विनोद सपकाळे इत्यादींनी परिश्रम घेतले.







