2 लाखांसाठी पोटच्या लेकीचा आईनं केला सौदा!

minor-girl-nikah-file-photo

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) – येथील सिव्हील लाइन्स क्षेत्रात एका आईनं आपल्याच पोटच्या मुलीचा 2 लाखात सौदा केला आहे. तिनं आपल्या अल्पवयीन मुलीचा निकाह एका वयस्कर व्यक्तीसोबत केला आहे. याबद्दल मुलीनं तक्रार दिल्यानंतर सिव्हील लाइन्स पोलिसांनी मुलीच्या आई आणि तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी संध्याकाळी अगवानपुरमध्ये राहाणारी एक अल्पवयीन मुलगी सिव्हील लाइन्स पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसात तिने सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. तिचं असं म्हणणं होतं, की तिच्या घरच्या लोकांनी बळजबरीनं तिचा निकाह एका दारू पिणाऱ्या व्यक्तीसोबत करून दिला आहे. सासरी गेल्यानंतर तिला समजलं, की तिच्या आई आणि बहिणींनी 2 लाखात तिला विकलं आहे.

या अल्पवयीन मुलीनं असंही म्हटलं, की तिची आई आणि बहिण यांचे अनेकांसोबत संबंध आहेत. ते सर्व तिलादेखील या सगळ्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, तिनं नकार दिल्यानं 2 लाख रूपये घेत तिचा निकाह करण्यात आला. सासरीदेखील तिच्यावर अत्याचार केले जात असल्याचं, तसंच पती बळजबरीनं तिला इतरांसोबत संबंध ठेवण्यास सांगत असल्याचंही अल्पवयीन मुलीनं म्हटलं आहे.

सासरच्या लोकांपासून वाचत तिनं हा संपूर्ण प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला आणि याविरोधात तक्रार केली. यावेळी तिनं दोघींच्याही जीवाला धोका असून आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या आई आणि मुलीच्या पतीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here