नियमित सेक्स केल्याने आयुष्यमान वाढते; न्यू इंग्लैंड रिसर्च इंस्टीट्यूटचा नवा रिसर्च

sex

लंडन – नियमित सेक्स केल्याने आयुष्यमान वाढते असा एक नवा रिसर्च समोर आला आहे. या रिसर्चनुसार नियमित किंवा आठवड्यात एकापेक्षा जास्त वेळा सेक्स केल्याने वयोमान वाढते असे समोर आले आहे. न्यू इंग्लैंड रिसर्च इंस्टीट्यूटच्या संशोधक 22 वर्षांपासून यावर अभ्यास करत होते. अखेर यावर्षी त्यांचे संशोधन पूर्ण झाले असून त्यातून ही माहिती समोर आली आहे.

न्यू इंग्लैंड रिसर्च इंस्टीट्यूटने केलेल्या सर्व्हेमध्ये 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 120 व्यक्तींवर हा अभ्यास करण्यात आला. त्यांच्यावरील अभ्यासावरून हे समोर आले आहे की नियमित सेक्स केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. या सर्वेक्षणानुसार ज्या लोकांना नियमित सेक्स केला त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मरण्याची शक्यता इतरांपेक्षा 27 टक्क्याने कमी आहे. तर कधी कधी सेक्स करणाऱ्यांच्या मृत्यूची शक्यता फक्त आठ टक्क्यांनी कमी आहे. आठवड्यातून किमान एक वेळा सेक्स करणाऱ्यांच्या दिर्घायुष्याची शक्यता तब्बल 37 टक्के आहे.

याआधी अमेरिकन जर्नल ऑफ कार्डियोलॉजीने केलेल्या एका सर्वेक्षणातून देखील अशाच प्रकारची माहिती समोर आली होती. जे पुरुष नियमित सेक्स करतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. तर कमी सेक्स करणाऱ्या पुरुषांमध्ये अनेक आजार दिसून येतात. तसेच नियमित सेक्स करणारे हे कायम फ्रेश राहतात व त्यांची शारीरिक कामं करण्याची क्षमता देखील इतरांपेक्षा जास्त असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here