ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – खारघर येथील मदरहुड हॉस्पीटलमध्ये 58 वर्षीय महिलेच्या गर्भाशयातील कलिंगडाच्या आकाराचा ट्युमर काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.
गर्भाशयाच्या डाव्या बाजूला 17 × 15 × 10 सेमी असा 3 किलो वजनाचा हा ट्युमर आढळून आला होता. या महिलेला लॉकडाऊन दरम्यान वाढलेले पोट आणि वायु धरण्याची समस्या जाणवू लागली, त्यावेळी मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
नंतर काही काळाने योनीमार्गातून हलकासा रक्तस्राव सुरु झाला त्यानंतर मात्र त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. तेव्हा पॅपस्मिअर आणि सोनोग्राफी , सिटी स्कॅन आदी तपासणीअंती महिलेला या महिलेच्या गर्भाशयात भल्या मोठ्या आकाराचा ट्युमर आढळून आला.
मदरहुड हॉस्पिटल, खारघर येथील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभि सिद्धार्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला पोट फुगणे, पोटात वायु धरणे तसेच रजोनिवृत्तीनंतही हलकासा रक्तस्राव होत असल्याची तक्रार होती. रुग्णाच्या तिच्या सोनोग्राफीमध्ये डाव्या अंडाशयातून जवळजवळ कलिंगडाच्या आकाराचा ट्युमर दिसून आला. रुग्णाच्या सीटी स्कॅन अहवालात 16 सेमी × 17सेमी × 10सेमी या आकाराचा हा ट्युमर आढळून आला.
हा भल्या मोठ्या आकाराचा ट्युमर रुग्णाच्या आतड्यावर दबाव आणत होता. ज्यामुळे पोट फगणे तसेच वायु धरणे अशा समस्या जाणवत होत्या. डॉ. सुरभी सिद्धार्थ सांगतात अशी प्रकरणे लवकर ओळखणे फार महत्वाचे आहे. सखोल तपासणीनंतर, रुग्णाला लॅप्रोटॉमी घेण्याचे करण्याचा सल्ला देण्यात आला.
ऑन्कोसर्जन डॉ. शिशिर शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णावर लेप्रोटोमी किंवा ओपन सर्जरी करण्यात आली. तिची गर्भाशय, इतर अंडाशय आणि नलिका पुन्हा पुन्हा त्रास टाळण्यासाठी काढून टाकण्यात आल्या. रक्तस्त्राव यासारखे गुंतागुंत न करता शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली गेली. शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्याच दिवशी रुग्णाला घरी पाठविण्यात आले. आठवड्याभरानंतर रुग्णाची तपासणी केली असता रुग्ण पूर्णतः बरे झाल्याचे दिसून आले.
डॉ. शेट्टी सांगतात, शस्त्रक्रियेनंतर तिला कुठल्याही प्रकारचा त्रास फोट फुगणे, पोटाचा गॅस, जडपणा किंवा पाठदुखी जाणवत नव्हती. लॉकडाऊनमुळे लोकांना नियमित तपासणीपासून दूर राहावे लागले आणि अशा प्रकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. हॉस्पिटलमध्ये येण्याची आणि कोविडची भीती बाळगणे हे या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमुख कारण होते. महिलांनी नियमित आरोग्य तपासणी तसेच पॅप स्मीयर सारख्या चाचण्या घ्याव्या.
गर्भाशयातील ट्युमरमुळे मी निराश झाली. खारघर येथील मदरहुड हॉस्पिटलमधी डॉक्टरांनी मला प्रोत्साहन दिले तसेच माझ्या शरीरातील इतर कोणत्याही अवयवांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घेत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडली अशी प्रतिक्रिया या महिला रुग्णाने व्यक्त केली.







