ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना प्लॅटफॉर्म आणि रुळाच्या मध्ये एक 79 वर्षांचा प्रवासी अडकला. कल्याण स्टेशनवर 29 जानेवारीला ही घटना घडली आहे. तिकडे उपस्थित असलेल्या एका आरपीएफ जवानामुळे या प्रवाशाचा जीव वाचला आहे. आपला जीव वाचविल्याबद्दल या प्रवाशाने आरपीएफ जवानांचे आभार मानले.
शुक्रवारी दिल्लीला जाणारी पंजाब मेल रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी कल्याण रेल्वे स्थानकात चार नंबर प्लॅटफॉर्मवर आली. दिल्लीतील रहिवासी असलेल्या प्रवासी मासुर बफुर अहमद यांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा पाय घसरल्याने ते फलाट आणि रेल्वेच्या मधील गॅपमध्ये पडले, यावेळी फलाटावर उपस्थित असलेल्या आरपीएफ जवान एस पी यादव आणि जितेंद्र गुजर यांनी तात्काळ धाव घेत मसूर यांना फलाटावर ओढून घेत त्यांचा जीव वाचवला.







