बाजार सावंगीत डाक मेळावा; प्रवर अधिक्षक नागा राजू यांनी केले मार्गदर्शन

bajarsavagi-dak-melava

बाजार सावंगी (प्रतिनिधी.मूनीर शाह) – भारतीय डाकघर औरंगाबाद विभागाच्यावतीने बाजार सावंगी तालुका खुलताबाद येथे गुरुवार तारीख 28 डाक मेळावा यशस्वी पार पडला विविध योजना द्वारा 23 लाख 55 हजार सहाशे रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला

शिबिराचे उद्घाटन डाक विभाग प्रवर अधीक्षक जी शिवा नागा राजू यांच्या हस्ते झाले मुख्य व्यवस्थापक श्री कुलकर्णी निरीक्षक सौरभ मेनन सुपरवायझर बी पी गरड उपस्थित होते प्रास्ताविक पोस्ट मास्तर पाराजी जाधव यांनी केले पुंजाजी नलावडे भीमराव नलावडे ज्ञानेश्वर नलावडे अल्पबचत प्रतिनिधी श्रीधर पाटील

दैनिक मराठवाडा पत्रकार मूनीर शाह..डॉक्टर गिरी पंचायत समिती गटनेता प्रभाकर शिंदे भिकन घुले उपस्थित होते पोस्टातील आर्थिक गुंतवणूक सुविधा व अंमलबजावणी यासंबंधी विचार मांडले तसेच गावात पोस्ट एटीएम शाखा असावी अशी मागणी केली. अध्यक्षीय समारोप करताना श्री नागा राजू यांनी पोस्टाच्या विविध योजनांची आवर्ती ठेव सावधी ठेव, मासिक प्राप्ती भविष्य निर्वाह निधी सुकन्या समृद्धी ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय बचत किसान विकास पत्र अटल पेन्शन प्रधानमंत्री सुरक्षा व जीवन ज्योती विमा योजना याबाबत सविस्तर माहिती दिली मेळाव्यास उत्तम प्रतिसाद पाहून कौतुक केले तसेच गावातून एप्रिल 21 पर्यंत प्रत्येक घराचे खाते उघडले जावे असे आवाहन केले व एटीएम शाखा देण्याचे मान्य केले

ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थी व शिक्षक यांची उपस्थिती होती सर्वांना मास्क चे वाटप करण्यात आले सहा शाखा असून 36 गावांचा समावेश पोस्टात आहे.बोडखा शाखा मास्तर रमेश सोनवणे सुलतानपूर चे तुषार जोगस पाडळी चे अशोक गायकवाड शिरोडी चे वैभव वेता ळ एस गावचे प्रभाकर खंडागळे ग्रामीण डाक सेविका श्रावणी बोरडे यांनी टेबल मांडून सायंकाळी पाचपर्यंत व्यवहार केले

सुकन्या पस्तीस खात्यातून 10 हजार पाचशे 18 बचत खात्यातून 11 हजार 700 जीवन विमा वीस ग्राहकांचा 20 लाखांचा तर पेटीएम द्वारा तीन लाख तेहतीस हजार 400 रुपयांचा व्यवहार झाला 17 आधार कार्ड ची दुरुस्ती व दोन नवीन आधार कार्ड काढण्यात आले मात्र फी 0 ते 50 रुपये आकारण्यात आली. मेळावा यशस्वी करण्यासाठी कर्मचारी सुभाष जयस्वाल सचिन खंडागळे श्री साळुंके श्री विसपुते यांनी पुढाकार घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here