महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला कंगना रणौतने नथुराम गोडसेच्या समर्थनात केलं वादग्रस्त ट्वीट

kangana-ranaut

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – सिनेमांपेक्षा सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एक वादग्रस्त ट्वीट केलं आहे. कंगनाने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच ३० जानेवारी रोजी त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या संदर्भात एक ट्वीट केलं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

कंगनाने नथुराम गोडसे याचे फोटो ट्वीट करत लिहिलं की, ‘प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात. एक तुमची.. एक माझी आणि एक खरी. चांगली कथा सांगणारा कधीही बांधिल नसतो आणि तो काही लपवतही नाही. म्हणूनच आपली पुस्तकं निरुपयोगी आहेत. त्यात फक्त दिखावाच आहे.

या ट्वीटमध्ये कंगनाने एका प्रकारे महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचं नथूराम गोडसे याचं समर्थन केलं आहे. यानंतर सोशल मीडिया यूजर्स तिच्यावर टीका करत आहेत आणि पुण्यतिथीला हे ट्वीट टाकल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here