जळगाव (प्रतिनिधी) – येथील देशमुख ऍड्वर टाईज चे मालक,मील्लत एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा जमात-ए-इस्लामी हिंद जळगाव जिल्ह्याचे ३५ वर्ष अध्यक्षपदी राहिलेले मोहम्मद जाहीद देशमुख यांचा वृद्धापकाळाने १० जुलै रोजी जळगाव येथील त्यांच्या रहाता घरी शनी पेठ येथे निधन झाले.
आज जळगाव शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. सभेच्या अध्यक्ष स्थानी फैजपूर येथील तथा महाराष्ट्र प्रदेश चे जमात ए इस्लामीचे प्रमुख अब्दुल रऊफ हे होते. व्यासपिठावर मुफ्ती अतिकुर रहेमान, गफ्फार मलिक,डॉ अमानउल्लाह शहा,अब्दुल समी, अल्लाउद्दीन सेठ,करीम सालार, फारूक शेख,मुश्ताक मिर्झा, आरिफ देशमुख,साजिद देशमुख,डॉ जावेद शेख आदी होते.
या सभेचे आयोजन जमियत उलमा ए हिंद,जमात ए इस्लामी, कुल जमाती कौन्सिल, वाहिदात ए इस्लामी, मुस्लिम ईदगाह ट्रस्ट, व एमपीजे यांच्या माध्यमाने ईदगाह मस्जिद मध्ये करण्यात आले होते. या सभेत येणाऱ्या लोकांचे हात द्वार वर सानिटायझेर करून घेण्यात आले तसेच त्यांना काही सामाजिक अंतर ठेवून बसवण्यात आले होते. व्यासपीठावरील खुर्च्या सुद्धा सामायिक अंतरावर ठेवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मील्ली अहद यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली.
यात खालील वक्त्यांनी मोहम्मद जाहिद देशमुख यांच्या आठवणी थोडक्यात विशद केल्या त्यात प्रामुख्याने मौलाना अहद मिल्ली,सोहेल अमीर , ज़ाकिर ख़ान सर,मुश्ताक़ मिर्ज़ा, इकबाल शाह,फारूक शेख,डॉ. अमानुल्लाह शाह, जमील देशपांडे, अब्दुल करीम सालार,अब्दुल समी खान,सैय्यद चाँद अमीर,अलाउद्दिन सेठ,अलहाज अब्दुल गफ्फार मालिक,मुफ़्ती अतिकुर्ररहमान,आरिफ देशमुख,जावेद देशमुख, अब्दुल रऊफ शेख, आदी ची भाषणे झाली.
यात प्रामुख्याने डॉ प्रो एम इकबाल,इंजिनिर अल्तामश खान, ताजुद्दीन शेख,फरीद शेख,आबिद शेख,अझीझ सालार,सलीम मानियार,नदीम काझी,ताहेर शेख,तय्यब शेख,अहेमद सर,महेमुद खान,आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जावेद शेख यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिस शहा, महमूद खान, फारुक शेख, मोहसिन सय्यद ,जाकीर खान व मुस्ताक मिर्झा आदींनी प्रयत्न केले.







