देव नेहमी चांगल्या लोकांना घेऊन जाताे – सिध्दार्थ डी.जाधव

मुंबई (प्रतिनिधी) – बुधवार (दि.१५) काेराेना योद्धा व गोरगरीबांचे कैवारी,पोलीसांच्या न्याय हक्कासाठी लढणारे पालघर जिल्हा अध्यक्ष दिपक गोसावी यांचे हृदयविकाराने निधन झाले
दीपक गोसावी हे काेराेना महामारी चालू झाल्यापासून गेले ४ महिन्यांपासून गोरगरिबांना अन्नधान्य तसेच आरोग्याच्या सुविधा देत होते तसेच पोलिसांना सॅनिटायझर, मार्क्स , होमिओपती औषध गोळ्या हे प्रत्येक पोलिस स्टेशन रेड झोनमध्ये जाऊन वाटप करत होते पालघर जिल्हा अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यापासून अनेक उपक्रम त्यांनी राबवले अनेकांना भाजीपाला व्यवसाय उपलब्ध करून दिले दीपक गोसावी हे नेहमी हसतमुख राहायचे कधी कुणाचे त्यांनी मन दुखावले नाही काही दिवसांपूर्वी दीपक गोसावी यांना कोराेना योद्धा गौरव २०२० ने सन्मानित केले होते अनेक सामाजिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
संपूर्ण पालघर टीमला सोबत घेऊन ते आपले कार्य करत होते पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे पोलीस बॉईज असोसिएशनचे कार्यालय त्यांनी उघडले होते रात्री बेरात्री कधी पण ते गरीबांच्या न्यायहक्कासाठी लढायचे ,पालघरमध्ये कोरोना महामारी मध्ये ४ महिने त्यांनी अन्नदान वाटप करण्यामध्ये खंड पडू दिला नाही असे दीपक गोसावी पालघर जिल्ह्यातील गोरगरिबांचे वाघ होते. त्यांना श्रध्दांजली वाहताना पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रदेश कार्याध्यक्ष सिध्दार्थ डी. जाधव म्हणाले की, अाज आमचा ढाण्या वाघ आमच्या पोलीस बॉईज असोसिएशन मधून निघून गेला अशा ढाण्या वाघाला माझा मानाचा मुजरा कोणतेही सामाजिक कार्य करताना ते नेहमी माझ्या संपर्कात राहायचे मला प्रत्येक गोष्टीची ते माहिती द्यायचे आणि तीच व्यक्ती आज आमच्या आयुष्यातून निघून गेली, असा लढाऊ काेराेंना योद्धा हृदयविकाराच्या धक्क्याने आज आमच्यातून निघून गेला ईश्वर त्यांच्या कुटुंबांना लढण्याची शक्ती देयाे त्यांच्या कुटुंबाच्या सह दुःखात महाराष्ट्र पोलीस,गृहरक्षक दल , पोलीस बॉईज असोसिएशन दुःखात सामील आहाेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here