अल्पवयीन मुलीसोबत चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार

rape-in-car

जशपूर (मध्यप्रदेश) – एका अल्पवयीन मुलीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना मध्यप्रदेशातील जशपूर येथे घडली आहे. बगीचा आणि बतौली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रातोरात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

झी न्यूज इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, छत्तीसगड येथील जशपूर येथे ही घटना घडली आहे. पीडिता अल्पवयीन आहे. 28 जानेवारी रोजी पिडीता सरगुजा येथे आपल्या बहिणीच्या साखरपुड्याला घुगरी गावात गेली होती. सायंकाळी 7 वाजता ती घरातून निघाली होती. वाटेत तिला आरोपी अजीत किस्पोट्टा भेटला. त्याने तिला थांबवून फिरायला घेऊन जातो असे सांगितले. त्यामुळे तिनेही लगेच होकार देत त्याच्यासोबत गेली. मात्र तो तिला जंगलाच्या दिशेने घेऊन गेला.

आरोपीने तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी अजितने संधी साधत रविकांत एक्का, आनंद एक्का आणि संदीप एक्का या तीन मित्रांना तिथे फोन करुन बोलावले. काहीवेळाने त्याचे तिन्ही मित्र बोलेरो घेऊन त्या जंगलात आले. त्यांनी चालत्या गाडीत एक-एक करून सगळ्यांनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपींनी पीडितेला पूर्ण रात्र सोबत ठेवले होते आणि सकाळी तिला घराच्या बाहेर फेकले. घाबरलेल्या पीडितेने घरी काकीला घडलेला प्रसंग सांगितला. संतापलेल्या घरच्यांनी थेट सरगुजा जिल्ह्यातील बतौली ठाण्यात तक्रार केली आहे.

या प्रकरणाची पोलिसांनी तातडीने दखल घेत बगीचा आणि बतौली पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यात त्यांनी आरोपीचे लोकेशन ट्रेस केले. नाकाबंदी करून रातोरात तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात 376(2), (D), 5, 6 पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here