पोलिओ लसीकरणात 12 मुलांना सॅनिटायझर पाजले

polio-vaccine-file-photo

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला 31 जानेवारीपासून देशभर सुरुवात झाली. मात्र पोलिओ लसीकरणादरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटायजर पाजल्याचा धक्कायदायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱया कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान लहान मुलांना सॅनिटीझर पाजण्यात आले आहे. 1 ते 5 वयोगटातील ही मुले आहेत.

सुरुवातीला सॅनिटायजर पाजलेल्या मुलांना उलटय़ांचा त्रास सुरू झाला. त्यांनंतर त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ घटनेची चौकशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here