डोंबिवलीत मनसेला खिंडार : मनसे पदाधिकाऱ्यांनी बांधले शिवबंधन

dombavali-shivsena

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला डोंबिवलीमध्ये मोठे खिंडार पडले आहे. आज येथील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

यामध्ये राजेश शांताराम कदम (मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष,व माजी परिवहन सभापती), सागर रवींद्र जेधे (मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष), दीपक शांताराम भोसले (डोंबिवली शहर संघटक व माजी परिवहन सदस्य), राहुल गणपुले (प्रदेश उपाध्यक्ष, जनहित कक्ष), कौस्तुभ फकडे (सचिव, मनविसे डोंबिवली शहर), सचिन कस्तुर (मनविसे शहर संघटक), स्वप्नील वाणी (मनसे शाखा अध्यक्ष), निखिल साळुंखे (मनसे उपशाखा अध्यक्ष), कुणाल मोर्ये (मनविसे शाखा अध्यक्ष), महेश कदम, राजेश मुणगेकर (शहर संघटक) यांनी त्यांच्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here