सामना सुरू असताना भर मैदानात खेळाडूने उतरवली पँट आणि …

Usman-Khwaja

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – येथे सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेत रविवारी ब्रिस्बेन हिट आणि सिडनी थंडर संघात नॉकआऊट लढत रंगली. या लढतीत ब्रिस्बेन हिटने सिडनी थंडरचा पराभव केला आणि अंतिम फेरीत जाण्याच्या आशा कायम राखल्या. सिडनी थंडरने दिलेले 159 धावांचे आव्हान ब्रिस्बेन हिटने 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 5 चेंडू बाकी असताना पार केले. याच लढतीत सिडनी थंडरच्या खेळाडूने भर मैदानात पँट उतरवली आणि विरोधी संघाच्या खेळाडूंसह प्रेक्षकही अवाक झाले.

नॉकआऊट लढतीत सिडनी थंडर संघाने प्रथम फलंदाजी केली. सिडनी थंडरकडून अॅलेक्स हेल आणि उस्मान ख्वाजा सलामीला उतरले. आठ षटकांचा खेळ झाल्यानंतर उस्मान ख्वाजा याने आपली पँट उतरवली. ख्वाजाने अचानक केलेल्या या कृतीमुळे मैदानातील प्रेक्षक आणि समालोचकही आपले हसू आवरू शकले नाहीत.

नवव्या षटकामध्ये उस्मान ख्वाजा आपले पॅड, शूज आणि पँट काढून चड्डी निट करू लागला. यामुळे खेळ काही काळासाठी रोखण्यात आला. ख्वाजाच्या या कृतीमुळे मैदानावरील खेळाडू, प्रेक्षक आणि समालोचकही हसू आवरू शकले नाही. सर्व काही सावरल्यानंतर ख्वाजाने पुन्हा पँट चढवली आणि मग खेळ सुरु झाला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या 34 वर्षीय खेळाडूचा हा व्हिडीओ ‘7 क्रिकेट’ने आपल्या ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनही दिले असून, याआधी आपण असे कधी पाहिले आहे का? उस्मान ख्वाजा मैदानावरच सर्व काही बदलतोय, असे म्हटले. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. याखाली अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

दरम्यान, या लढतीत सिडनी थंडरने 158 धावा केल्या. सिडनी थंडरकडून सॅम बिलिंग्ज आणि बेन कटिंग यांनी प्रत्येकी 34 धावा केल्या, तर उस्मान ख्वाजाने 30 चेंडूत 28 धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रिस्बेन हिटकडून सॅम हेजले याने नाबाद 74 आणि जिमी पिअर्सनने नाबाद 43 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here