ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – भिवंडीतील माणकोळी येथे प्लॉट क्र ए -8 मधील हरिहर कम्पाऊंडमध्ये असलेले दुमजली गोडाऊन कोसळल्याचे वृत्त आहे. या अपघातात 1 कामगार ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
याशिवाय, ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे अग्निशमन केंद्र आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकाला (टीडीआरएफ) मदत आणि बचावकार्यासाठी रवाना करण्यात आले आहे. तसेच घटनेचं गांभीर्य पाहून एनडीआरएफ पथकालाही पाचारण करण्यात आलेय.







