पाच वर्षांच्या मुलावर वृद्धाचा लैंगिक अत्याचार; न्यायालयाने दिली 10 वर्षांची शिक्षा

prism

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – पाच वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 58 वर्षीय वृद्धाला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईतील विशेष पोक्सो कार्यालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. या आरोपीचं नाव मोहम्मद खातिर असं आहे.

ही घटना 4 एप्रिल 2018 रोजी घडली होती. मोहम्मद खातिर याला पीडित मुलगा ओळखतो. तो त्याला मुर्गीवाला चाचा असं म्हणत असे. पीडित मुलगा आपल्या घराबाहेरच खेळत होता. खेळ संपवून घरी परतला तेव्हा तो खूप घाबरलेला दिसत होता. त्याच्या आईने जेव्हा याबाबत विचारलं तेव्हा उत्तर देण्याऐवजी तो घरच्या पहिल्या मजल्यावर पळाला. त्याच्या पाठोपाठ त्याची आईही पहिल्या मजल्यावर पोहोचली. तिथे गेल्यानंतर तिला दिसलं की पीडित मुलगा त्याची अंतर्वस्त्र काढून मान खाली घालून बसला होता.

हे पाहून हादरलेल्या त्याच्या आईने त्याला पुन्हा विचारलं. तेव्हा सुरुवातीला गप्पच असलेल्या मुलाने त्याच्यासोबत घडलेला प्रसंग आईला सांगितला. त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका 58 वर्षीय मोहम्मद खातिर याने त्याला 2 रुपये दिले आणि भुलवून आपल्या घरी घेऊन गेला.तिथे त्याने त्याला लाकडी बाकावर झोपवलं. त्याचे सगळे कपडे काढले आणि त्याच्या खासगी अवयवांना तो स्पर्श करू लागला. त्याने पीडित मुलाच्या शरीरावर हस्तमैथुनही केलं. या प्रकाराने मुलगा प्रचंड घाबरला होता.

हा प्रकार ऐकून मुलाची आई प्रचंड संतापली. तिने त्याला सोबत घेऊन मोहम्मदचं घर गाठलं आणि त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने माफी मागत, माझ्यावर सैतानाने कब्जा केला होता, म्हणून माझ्या हातून हे कृत्य घडलं असं स्पष्टीकरण दिलं. या नंतर पीडित मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाने खातिर याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here