मॅफेड्रॉन विक्री करणाऱ्याला अटक, 3 लाख 25 हजारांचे एमडी जप्त

arrested

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – मॅफेड्रॉन अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा तीन लाख रुपयांचे 81 ग्रॅमचे एमडी जप्त करण्यात आले आहे. तोफिक मोहम्मद शफी बागवान (वय 26, रा. भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध धंदे आणि अमली पदार्थ विक्री करणाऱ्याविरूद्ध गुुन्हे शाखेकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी साईबाबा नगर येथील सार्वजनिक रस्त्यावर एकजण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ सव्वा तीन लाख रुपयांचे 81 ग्रॅम मेफेड्रॉन आढळले. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सुजीत वाडेकर, प्रवीण शिर्के, संदीप जाधव, पांडुरंग पवार, राहूल जोशी, विशाल शिंदे, मनोज साळुंके, रमेश चौधर, प्रवीण उत्तेकर, योगेश मोहिते, संदेश काकडे, मीतेश जाधव, रेहाना शेख, रूबी अब्राहम यांच्या पथकाने केली.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मागील सहा महिन्यात छापेमारी केली आहे. त्यानुसार तब्बल 20 लाख रूपये किंमतीचे 507 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले आहे. त्यामध्ये 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याशिवाय 19 आरोपींवर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here