दलित महिलेवर बलात्कार; ५ अल्पवयीन मुलांचाही गुन्ह्यात सहभाग

gang-rape

बलात्काराचा व्हिडीओ करुन तो केला सोशल मिडीयावर व्हायरल

बडगाव – येथील एका 35 वर्षांच्या दलित महिलेवर एका सज्ञान व्यक्तीसह पाच अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला आहे. केवळ बलात्कार करून हे आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी त्याचं व्हिडीओ चित्रण करून ऑनलाईन पोस्ट केलं. त्याच्या विक्रीची किंमत ठेवली 300 रुपये. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

या गुन्ह्यासंदर्भात सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडिता पोलिसात तक्रार करण्यास गेल्यावर गुरुवारी रात्री आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींपैकी पाच जण 15 ते 17 वर्ष वयोगटातील आहेत. या पाचही जणांना बालगृहात पाठवलं गेलं आहे. याशिवाय यातील सज्ञान आरोपीला तुरुंगात पाठवलं गेलं आहे.

ही महिला आणि पाचही मुलं शेजारी राहत असून एकमेकांना ओळखतात. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या मुलांनी महिलेला शेतात नेलं होतं. तिथं त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही संपूर्ण घटना मोबाईलवर रेकॉर्ड केली. ही घटना कुणाला सांगितली तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्यांनी तिला दिली. त्यामुळं ती शांत राहिली. बुधवारी यातील 19 वर्षांच्या आरोपीनं हा व्हिडिओ व्हायरल केला. त्यांनतर या महिलेला याबाबत कळालं.

बडगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिद्धार्थ वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री एफआयआर दाखल केला गेला. तिघांना अटक झाली. पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, की आरोपी या परिसरातील लोकांमध्ये व्हिडिओ क्लिप ३०० रुपयात विकत होते. पाच बालकांविरुद्ध कलम 376 डी, 506 तसेच एससी-एसटी ऍक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोबतच सज्ञान आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here