ममता बॅनर्जी यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

mamata-banarjee

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळं (West Bengal Assembly Election) सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष या राज्यांकडं लागलं आहे. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच पक्ष वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही (Mamata Banerjee) मागे नाहीत. सध्या ममता बॅनर्जींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे, या व्हिडिओमध्ये त्यांनी गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळत आहे.

ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यात पोहोचल्या आणि त्यांनी फलकटामध्ये एका सामूहिक विवाहसोहळ्यात हजेरी लावली. या विवाहसोहळ्यात पारंपारिक नृत्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डान्स करणाऱ्या कलाकारांनी ममता बॅनर्जींचा हात धरुन त्यांना खुर्चीवरुन उठवलं. यानंतर त्या स्वतःला डान्स करण्यापासून थांबवू शकल्या नाहीत. ममता बॅनर्जींनीही त्यांच्यासोबत मनसोक्त डान्स (Mamata Banerjee Dance Video) केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here