लाकडी काठीने डोक्यावर वार करत भररस्त्यात घेतला भावाचा जीव

brother-murder

लखनऊ – भावंडांमध्ये वाद हे होतच असतात. पण कधी कधी हे वाद इतके शिगेला पोहोचता की अगदी टोकाचं पाऊल उलललं जातं. रागात हातून काय विपरित घडू शकतं हे सांगूही शकत नाहीत. ही भावंडं एकमेकांच्या जीवावरही उठतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका भावानं दुसऱ्या भावाच्या डोक्यावर दांड्यानं सपासप वार करत त्याचा जीव घेतला आहे.

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुरातील ही धक्कादायक घटना. सोशल मीडियावर दोन भावांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. क्षुल्लक कारणावरून दोन्ही भावांमध्ये वाद झाले आणि हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. तरती बाजारमध्ये राहणारा विनोद आणि मुकेश, दोघं चुलत भाऊ. त्यांच्यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू झाली. सुरुवातीला दोघांच्याही हातात एक दांडा आहे. त्यानं विनोद मुकेशला धक्का देऊन त्याच्या हातातून दांडा हिसकावून आपल्या हातात घेतो आणि आधी त्याच्या डोक्यावर दांड्यानं वार करतो. तेव्हाच मुकेश जमिनीवर कोसळतो. अर्धमेला झालेला दिसतो. तरी विनोद थांबत नाही. तो मुकेशच्या डोक्यावर दांड्यानं सपासप चार वार करतो.

मुकेशची हालचालही थांबली. तो गंभीररित्या जखमी झाला. तिथं काही लोकही होते. पण या दोघांमधील असं भांडण पाहून कुणीच पुढे येण्याची हिंमत केली नाही. पण नंतर मुकेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोमवारी ही घटना घडली होती आणि मंगळवारी मुकेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी मुकेशचा मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. तर आरोपी विनोदविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here