चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

child-file-photo
संग्रहित छायाचित्र

लखनऊ – चौदा वर्षाच्या अल्पवयीन बलात्कार पिडीतेन एका बाळाला जन्म दिला आहे. या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला असून याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एका अल्पवयीन मुलीवर नऊ महिन्यांपूर्वी बलात्कार झाला होता. मात्र घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणाकडेही वाच्छता केली नाही. अचानक पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात नेले. उन्नाव जनपद येथील कोतवाली भागातील ही घटना आहे. पिडीता तिच्या आईच्या वडिलांकडे राहायला गेली असताना शेजारी राहत असलेल्या युवकाने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. मात्र घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणालाही काही सांगितले नाही.

नऊ महिन्यानंतर या घटनेचे सत्यसमोर आले आहे. चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या जेव्हा पोटात अचानक दुखायला लागले. तिला लगेच जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा केला. या घटनेने तिच्या घरच्यांना प्रचंड हादरा बसला आहे. कोणालाही जे ऐकलय त्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी त्वरीत घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पिडीतेने बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ.गोपी कृष्ण तिवारी यांचे म्हणणे आहे की चाईल्ड लाईनने बाळ आणि मातेला जिल्हा चिकित्सालयात भरती केले आहे. बाळ स्वस्थ झाल्य़ानंतर त्याला बाल गृह लखनऊ येथे पाठवण्यात येणार आहे. जिथे त्याचे संगोपन होईल. पिडितेने पोलिसांना सांगितले की शेजारी असलेल्या युवकाने तिच्यावर बळजबरी केली. त्याबाबत तिच्या आजोबांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला कारावासात ठेवण्य़ात आले आहे. उन्नावच्या गौरव त्रिपाठी यांनी सांगितले की आम्हाला एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची माहिती मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here