मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बिग बॉसचे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. तीन महिन्यांपूर्वी ओम स्वामी यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. काही वेळापूवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले.
ओम स्वामी यांचे जवळचे मित्र मुकेश जैन यांचे पुत्र अर्जुन जैन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. 15 दिवसांपूर्वी ओम स्वामी यांना पक्षाघाताचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांचा आज मृत्यू झाला.







