भुगाव कंपनीत स्फोट, 30 मजूर होरपळल्याचा अंदाज

uttam-galva-company-vardha

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथे असलेल्या उत्तम गाल्वा मेटॅलिक कंपनी. या केमिकल फॅक्टरीत बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास स्फोट होऊन 30 पेक्षा अधिक मजूर होरपळल्याची घटना घडली आहे.

या स्फोटामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान सर्व जखमी मजुरांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी फॅक्टरीच्या गेटसमोर पत्रकारांना रोखून धरण्यात आले तर एका इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली आहे.

घटनास्थळी सावंगी पोलिस ठाण्याचे ठाणेदार रेवचंद शिंगांनजुडे आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले आहे. ब्लास्ट फर्निशचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तम गलवा कंपनीत झालेल्या स्फोटाची चौकशी कामगार अधिकऱ्यांमार्फत होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी निर्गमित केली आहे. चौकशी अंती दोषींवर कारवाई प्रस्तावित होईल असे घटनास्थळाची पाहणी केल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here