पुण्यात पूर्ववैमनस्यातून दोघांवर खूनी हल्ला, एक अटकेत

attack-by-koyata

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना सोमवारी रात्री बिबवेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दहा ते बारा जणांचा शोध सुरू आहे. केदार गणेश रापर्ती (वय २०, रा. अप्पर इंदिरानगर) याला अटक केली आहे.चंदर राठोड (वय १८, रा. अप्पर इंदिरानगर) याने तक्रार दिली आहे.

केदार आणि रोठोड यांचे पूर्वीचे वाद आहेत. सोमवारी रात्री केदार बिबवेवाडीत साथीदारांसोबत आला. त्याने जमाव जमवून राठोड, त्याचे मित्र करण शिंदे, ओंकार भिसे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये राठोड व करण शिंदे यांच्या डोक्यात व हातावर वार झाल्यामुळे ते जखमी झाले. इतरांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here