अनेक हुकूमशहांची नावं ‘M’ पासूनच का सुरू होतात? – राहुल गांधी

rahul-gandhi

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा नवीन ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता इशाऱ्या इशाऱ्यात टिका केल्याचे बोलले जात आहे. या ट्वीटवरून मोदी समर्थक आणि राहुल गांधी समर्थकही एकमेकांना भिडले आहेत.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक लिस्ट जाहीर केली आहे आणि लिहिले आहे की कित्येक हुकूमशहांचे नाव ‘M’ पासून कसे काय सुरू होते. या दरम्यान, राहुल गांधी यांच्याकडून जगभरातील हुकूमशहांची नाव असलेली यादी जाहीर केली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये एफ. मार्कोस (फिलीपींस), बी. मुसोलिनी (इटली), एस. मिलोसेविक (सर्बिया), हुस्नी मुबारक (इजिप्त), मोबुतू (कांगो), मिशेल मिकोमबेरो (बुरुंडी), परवेज मुशर्रफ (पाकिस्तान) यांच्या नावाचा समावेश आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने कृषी कायद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे.

दिल्लीच्या सीमांच्या आजूबाजूच्या पोलिसांद्वारे बॅरिकेडिंग केले गेले आहेत. यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. दिल्लीच्या सीमेवर सीमेंटने बॅरिकेडिंग केली गेली आहे, रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले आहेत. यावरूनच काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, सरकारला पुल बनवले पाहिजेत, भिंती उभ्या करू नयेत.

कृषी कायद्यांसह चीनचा प्रश्न, अर्थव्यवस्थेसह अनेक मुद्यांवरून काँग्रेसकडून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान कुणाचेच ऐकत नाहीत असे आरोप देखील काँग्रेसकडून करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here