खासगी वेबसाईटवरुन महिलांच्या देहविक्रीचा व्यवसाय; 2 आरोपींना अटक, 3 तरुणींची सुटका

mumbai-sex-racket

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – खासगी वेबसाईटद्वारे वेश्या व्यवसायाकरिता मुलींची पिळवणूक करून त्यांचा व्यवसाय करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 4 ने केलेल्या कारवाई दरम्यान अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून एका खासगी वेबसाईटवर महिलांच्या देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर या संदर्भात ही कारवाई करण्यात आली. उपेंद्र कुमार यादव (वय 25) व अशोक कुमार यादव अशी अटके केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वेबसाईटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधून बनावट ग्राहक बनून वेश्या करण्यासाठी महिलांची मागणी केली होती. त्यानंतर आरोपींनी बनावट ग्राहक बनलेल्या पोलिसांना पवई परिसरातील रॉयल ऑर्किड हॉटेल येथील रूम नंबर 105 मध्ये बोलावले असता पोलिसांनी या ठिकाणी धाड मारून 2 आरोपींना अटक केली असून 3 पीडित तरुणींची सुटका केली. यासंदर्भात पोलिसांनी उपेंद्र कुमार यादव (वय 25) व अशोक कुमार यादव या दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी सुटका केलेल्या तरुणींची चौकशी केली असता, अटक आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलींकडून वेश्याव्यवसाय करून दोन्ही आरोपी मोठ्या प्रमाणात दलाली घेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here