घाटकोपरची कोमल जैन सीएच्या परीक्षेत देशात पहिली

komal-jain

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – घाटकोपरची कोमल जैन या 22 वर्षाचा तरुणीने सीएच्या परीक्षेत देशात पहिला नंबर पटकावला आहे. कोमल ही माटुंगा येथील पोदार कॉलेजमधील विद्यार्थीनी असून तिने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सीए सीपीटी व अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झालेला आहे. या परीक्षेत 800 पैकी 600 गुण घेऊन मुंबईतील कोमलने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सुरत येथील मुदित अग्रवाल आणि मुंबईची राजवी नाथवानी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या परीक्षेत दोन्ही ग्रुप घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १४.५ टक्के म्हणजे १९ हजार २८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदा फक्त ग्रुप १चा निकाल १२.८ टक्के तर ग्रुप २चा निकाल ३१ टक्के इतका लागला आहे. यंदा ३२ हजार विद्यार्थ्यांनी ग्रुप १ तर २८ हजार विद्यार्थ्यांनी ग्रुप २ची परीक्षा दिली. घाटकोपरला राहणाऱ्या कोमलने २०१९मध्ये पोदार कॉलेजमधून बी. कॉम्.ची पदवी मिळवली. कोरोना महामारीमुळे सीएची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात झाली. या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here