जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार?

bajarsavangi-branch

बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शाह) – बाजार सावंगी येथील जिल्हा मध्यवर्ती शाखेतील अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला ग्राहक व नागरिक वैतागले असून बाजार सावंगी येथील जिल्हा मध्यवर्ती शाखेत गेली काही वर्षापासून अपूर्ण कर्मचारी-अधिकारी वर्ग कमी आहेत आणि जे आहेत ते औरंगाबाद येथून अपडाऊन करीत आहेत त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.

गेल्या आठ नऊ महिने या बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मनमानीपणे कारभार करीत आहे सकाळी दहा ऐवजी. दुपारी बारा वाजेपर्यंत बँक उघडत नाही त्यामुळे बँकेसमोर ग्राहकांच्या रांगा लागतात त्यात सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा ऊडाला असून अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे देत असतात.

अजून कॅश आली नाही.ऑनलाईन बंद आहे कॅशियर आला नाही प्रिंटर चालू नाही असे विविध प्रकारची कारणे दाखवून निव्वळ वेळ मारत आहे या अधिकाऱ्यांकडे व कर्मचाऱ्यांकडे बँकेच्या अध्यक्षांनी जातीने लक्ष देऊन या कर्मचाऱ्यांच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here