मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात पावसाला पावसाला पोषक परिस्थिती तयार झाल्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार

पाऊस होत आहे. मागील २२ तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तर, अद्यापही पावसाचा जोर कायमच आहे.
काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दादरमधील विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. यामुळे नागरिकांना जीवमुठीत धरूनच मार्ग काढावा लागत होता. मुंबई पोलीस नागरिकांना मदत करत होते. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पावसासाठी पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. १५ ते १७ जुलै या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.







