परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्दचा निर्णय रद्द – ट्रम्प

वॉशिंग्टन – अमेरिकेत राहून ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने मागे घेतला आहे. अमेरिकेच्या इमिग्रेश आणि कस्टम विभागाने न्यायालयातील ही माहिती दिली आहे. या नव्या निर्णयामुळे परदेशी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
युनेस्कोच्या अहवालानुसार भारताचे एकूण 3 लाख 32 हजार 33 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेतात. यात सर्वाधिक अमेरिकेत आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आणि जर्मनीचा क्रमांक आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, टेक्सास, मेसॅच्युसेटस् आणि इलिनॉय येथे भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन विद्यापीठांमध्ये ऑलनाईन शिक्षण घेणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला होता. त्यामुळे 10 लाख विद्यार्थ्यांना आपापल्या देशांमध्ये परतावे लागले असते. या 10 लाखांत जवळपास 2 लाख विद्यार्थी भारतीय आहेत. तथापि, या निर्णयाविरोधात जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, हार्वर्ड, एमआयटी विद्यापीठ यांनी बुधवारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अमेरिकेतील एका न्यायालयात सुनावणीवेळी ट्रम्प प्रशासनाने सांगितले की, जुना निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे त्या निर्णयानुसार होत असलेली कारवाईही स्थगित केली गेली आहे. अमेरिकेती परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक चिनी आहेत. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. पदवी आणि पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना एफ-1 आणि एम-1 कॅटेगरीचे व्हिसा जारी केले जातात. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवरही होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here