सराईत गुन्हेगारांची टोळी पालघर पोलिसांकडून जेरबंद

  • घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटत होते
  • चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत
  • तुळीज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
  • स्थानिक गुन्हे शाखा पालघर व तुळीज पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची कारवाई

मुंबई (हितेश मिस्त्री) – दिनांक २०/०९/२०१९ रोजी वेळी १०.२० वाजताचे दरम्यान युनायटेड पेट्रो.फायनान्स गोल्ड व्हल्युअर आयटीआय गोल्ड लोन शॉप नं.०३ आयरीश अपार्टमेंट पेट्रोलपंपाचे बाजुस पीएमसी बँक जवळ सेंट्रल पार्क नालासोपारा पुर्व येथे काही अनोळखी आरोपी इसमांनी गोल्ड फायनान्सच्या ऑफीस मध्ये शस्त्रांसह येवुन ऑफीसमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना शस्त्राचा धाक दाखवुन दरोडा टाकुन १,७६,८७,१३५/-रु किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल घेवून गेले बाबत फिर्यादी सुप्रज्ञा आनंद कदम वय-२४ वर्षे, रा. विरार पश्चिम, यांनी तुळींज पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरुन दि.२०/०९/२०१९ रोजी १८.४७ वा रोजी गु.र.नं. १०३४/२०१९ भा.दं.वि.सं.क ३९५, ४२७, सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,(२५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने गुप्त बातमीच्या आधारे सखोल तपास करुन सदर गुन्हयामध्ये १० आरोपीत निष्पन्न करुन त्यांना अटक करण्यात आली असुन त्यांचे कडे झाले तपासात त्यांनी यापुर्वी त्यांचे इतर साथिदार पाहीजे आरोपीत यांचे सह अश्याप्रकारचे अनेक गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयांचे गांभिर्य पाहुन सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२) व ३ (४) प्रमाणे कलमे मा.श्री.निकेत कौशिक साो. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांचे परवानगीने समाविष्ट करण्यात आलेली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच तुळींज पोलीस ठाणे नेमणुकीतील अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार करून उक्त गुन्हयातील अटक आरोपीत यांचे कडुन गुन्हयात गेलेला माल व गुन्हयातुन आरोपीत यांना मिळालेला मोबादला यामधुन रक्कम व त्या रक्कमेतुन खरेदी केलेल्या स्थावर मालमत्त तसेच सोन्याचे दागीने व सोन्याच्या लगडी, एक रिव्हॉल्वर, एक पिस्टल, ८ जिवंत काडतूसे, एक ईनोव्हा कार, एक प्रवासी रिक्षा असा एकुण (एक करोड ब्याएशी लाख चौसष्ट हजार एकशे पंचाहत्तर रुपये) १,८२,६४,१७५/- रु.चा माल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील कामगिरी श्री.अमोल मांडवे, उप विभा.पोलीस अधिकारी, नालासोपारा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तुळींज पोलीस ठाण्याचे स.पो.निरी./सुदर्शन गायकवाड, पो.ना/ ९३२ उमेश वरठा, पो.ना/ १३३२ किरण म्हात्रे, पो.ना/५८६ वाल्मिक आहीरे, पो.शि/ १४३९ सदानंद सावंत, पो.शि/ ५६ राऊत तसेच पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक, सहा.पो.निरी. सुहास कांबळे, स.पो.निरी. संतोष गुर्जर, स.फौ. चंद्रकांत कदम, सफौ/ महादेव वेदपाठक, पो.हवा./मंगेश चव्हाण, पो.हवा./जनार्दन मते, पो.हवा/ संजय नवले, पो.हवा./विकास यादव, पो.ना./ रमेश अलदर, पो.ना/प्रशांत पाटील पो.ना./ मुकेश तटकरे, पो.ना/ गोविंद केंद्रे, पो.ना/ शिवजी पाटील पो.ना/सागर बारवकर, पो.ना.अमोल तटकरे, पो.ना./प्रशांत ठाकूर, पो.ना/मनोज सकपाळ, पो.शि./ शरद पाटील, पो.शि/ अश्विन पाटील, पो.शि/अमोल कोरे यांनी पार पाडली आहे.

police

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here