महात्मा फुले स्मारकाच्या चबुतऱ्याची तोडफोड करणाऱ्यास शासन व्हावे – धरणगाव येथे निवेदन

धरणगाव (योगेश पी.पाटील) – यवतमाळ येथील तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मारकाच्या चबुतऱ्याची तोडफोड करणाऱ्यास कठोर शासन करण्याबाबत येथील बहूजन क्रांती मोर्चा व महात्मा फुले ब्रिगेड, धरणगांव यांच्या वतीने धरणगांव तहसिलला निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, दि.१४ जुलै रोजी विदर्भातील यवतमाळ येथील आझाद मैदानाजवळच्या भारतातील थोर समाजसुधारक, स्त्री – शुद्रांच्या शिक्षणाचे जनक, राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मारकाच्या चबुतऱ्याची जागोजागी तोडफोड केल्याचे निदर्शनास आले. विकृत माथेफिरुचे हे कृत्य असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र महापुरुषांची विटंबना करण्याचा हा प्रकार वारंवार घडत आहे. राजगृहावर हल्ला, छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि तात्यासाहेबांच्या चबुतऱ्याची तोडफोड. एकंदरीत सामाजिक वातावरण कलुषित करुन जनमानसात संतापाची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा मनुवादी प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करून दोषी व्यक्तीला तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यात यावे.
धरणगाव तहसीलदारांना निवेदन देताना बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , महात्मा फुले ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नरेंद्र महाजन तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी , बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील , महात्मा फुले क्रांती मंचचे आर. डी. महाजन , माजी जि. प. उपाध्यक्ष जानकिराम पाटील , चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे , माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील सर, शिवसेनेचे राजेंद्र महाजन , काँग्रेसचे चंदन पाटील , राजेंद्र ठाकरे , मोतीलाल पाटील , नगरसेवक ललित येवले , गुलाब मराठे , विलास महाजन , किशोर पवार सर , हेमंत माळी सर , लक्ष्मण पाटील सर , व्ही. टी. माळी सर , संतोष महाजन , वाल्मिक पाटील , किशोर पाटील , जितेंद्र धनगर , ललित पाटील , जयेश महाजन , गुलाब महाजन , राहुल मराठे , अतुल तायडे , गौरव चव्हाण , वैभव पाटील , रामचंद्र महाजन उपस्थित होत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here