(ॲड.जीवनदत्त अरगडे)
राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
२००९ मध्ये तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे ग्रामीण श्री भाऊसाहेब आंधळकर साहेब यांचा बार्शीच्या राजकारणातील झंझावात नुकताच सुरू झाला आमदार श्री. राऊत नुकतेच शिवसेनेमध्ये आमदारकीचा राजीनामा न देता काँग्रेस मध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सक्रीय झाले होते. त्या मुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये आम्हाला काँग्रेस पक्षात कार्यकत्यांनी स्थान देणे आणि निष्ठावंतांना न्याय देणे डोकेदुखीची झाले होते त्यामुळे पक्षांतर करणे शक्य नाही आणि बाजार समिती नगरपरिषद अशा निवडणुका कार्यकर्त्यांना लढवण्यासाठी सक्रीय होण्यासाठी बार्शी परिवर्तन महा आघाडी नावाची राजकीय पक्षांची नोंदणी अधिनियम २००९ प्रमाणे आघाडी करायची असा निर्णय झाला आणि मी त्या नोंदणीची जबाबदारी घेतली त्यामुळे त्याचा नोंदणीचा प्रस्ताव स्वतः टाईप करून त्यातील उद्देश आणि सगळा सविस्तर विहित नमुन्यातील परिशिष्ट आणि जोडपत्रे जोडून प्रस्ताव सादर केला . प्रस्तावातील मांडणी पाहून त्यांनी मला केबिन मध्ये बोलावून चहा पाजला आणि हा प्रस्ताव आदर्श उपविधी आणि मॉडेल प्रपोजल आणि मॉडेल बायलॉज म्हणून वाखाणण्याजोगा आहे. कित्येक नवीन प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त होतात मात्र त्यात सगळा सदोष प्रस्ताव असतो त्यामुळे त्यांना त्रुटी काय सांगायच्या म्हणून आम्ही सरळ नवीन प्रस्ताव करायला सांगतो मात्र तुमच्या या बार्शी च्या प्रस्तावामुळे आम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी नमुना प्रस्ताव तयार झाला आहे आपली हरकत नसेल तर आम्ही याच्या प्रती त्यांना देऊ .. मी म्हणालो निश्चित देऊन टाका..त्यांनी त्यांच्या कवितेचे पुस्तक मला दिले त्यांचे काही वर्तमानपत्रात लेख यायचे त्याचा संग्रह दिला..आणि एक अनौपचारिक मात्र संवेदनशील अशा कर्तव्यदक्ष अधिकारी यांना भेटून मला खूप बरे वाटले. त्यांच्या काळातच बार्शी परिवर्तन आघाडी , मंगळवेढा येथील रतन चंद शाह सहकारी बँकेचे सर्वेसर्वा स्वर्गीय सुभाष शाह यांची मंगळवेढा शहर विकास आघाडी कोल्हापूर येथील राजू माने कोल्हापूर शहर विकास आघाडी अशा राज्यातील तब्बल वीस आघड्यांची नोंदणी मी अल्पकाळात केली..एखाद्या राष्ट्रीय पक्षात आणि प्रादेशिक पक्षात दुसऱ्या फळीतील पुढाऱ्यांची हेळसांड होते अशा वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांना न्यात देण्यासाठी आणि वाद टाळण्यासाठी अशा आघाड्या करणे हे नित्याचे आणि क्रमप्राप्त झाले आहे..काही लोकांना पक्ष विचारधारा जमत नाही मात्र आपल्यासोबत काम करावयाचे अशी इच्छा असते त्यांना अशा व्यासपीठावर एकत्र येणे शक्य होते..निवडणूक चिन्ह वाटप यामध्ये प्राधान्य क्रम आणि पक्षांतर बंदी कायदा याचे संरक्षण यासाठी ही नोंदणी खूप परिणामकारक ठरते.. असो..
नीला सत्यनारायण या कर्तव्यदक्ष अधिकारी होत्या याशिवाय एक संवेदनशील कवयत्री देखील होत्या.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. त्यांच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो..प्रशासनातील त्यांची पोकळी भरून निघणे अशक्य आहे..
(लेखक उच्च न्यायालय मुंबई येथे वकील आहेत. मोबाईल 09545152888, 09699520711)







