माजी आमदारासह ८ जणांचा खून करून ‘साधूबाबा’ झालेल्या आरोपीच्या मेरठमधून मुसक्या आवळल्या

arrested

मेरठ – हरयाणातील बरवाला विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेल्या रेलूराम पूनिया यांच्यासह कुटुंबातील आठ जणांची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मेरठमधून अटक केली आहे. आरोपी मेरठमध्ये साधू बनून राहात होता. त्याच्यावर पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षिसही ठेवले होते. अखेर खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

‘आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, 23 ऑगस्ट, 2011 ला माजी आमदार रेलूराम यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ जणांची त्यांच्या मुलगी सोनिया आणि जावई संजीव यांनी मिळून हत्या केली होती. लिटानी येथील फार्महाऊसवर कुटुंबाची गेट टूगेदर पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीनंतर सर्व जण थकून झोपी गेले. झोपेत असतानाच सोनियाने आई, वडील, भाऊ, वहिनी, बहिण, भाचा आणि दोन भाच्या यांची धारधार हत्याराने वार करत हत्या केली.

पोलिसांनी आरोपी सोनिया आणि संजीव या दाम्पत्याला अटक केली. न्यायालयाने मे, 2004 ला दोघांना फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर 12 एप्रिल, 2005 ला उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेमध्ये केले. परंतु 15 फेब्रुवारी, 2007 ला सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत दोघांना फाशीची शिक्षा सुनावली. तसेच 23 ऑगस्ट, 2007 ला दोघांची पुर्नसुनावणीची याचिकाही फेटाळण्यात आली. 26 नोव्हेंबर 2007 ला दोघांना फाशी देण्यात येणार होती, मात्र संजीवच्या कुटुंबियांनी राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला, मात्र तो देखील फेटाळण्य़ात आला. परंतु फाशीचा दिवस काही उजाडला नाही.

अखेर 2018 ला संजीव खोट्या कागदपत्रांच्या आधारे 28 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला आणि फरार झाला. यानंतर जून, 2018 ला बिलासपूर पोलिसांनी कुरुक्षेत्र जेल अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केली आणि केस एसटीएफकडे हस्तांतरीत केली. गेल्या दोन वर्षांपासून एसटीएफचे पोलीस अधिकारी निर्मल सिंह आणि त्यांचे पथक आरोपी संजीव याचा शोध घेत होते. अखेर तो मेरठमध्ये साधू बनून राहात असल्याची खबर त्यांना मिळाली. पोलिसांनी मेरठमध्ये जाऊन त्याला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here