पेरु – कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या दहा महिन्यांपासून अनेक देशात न्यायालये बंद असून सर्व सुनावण्या ऑनलाईन सुरू आहेत. अशाच एका ऑनलाईन सुनावणीदरम्यान चक्क एक वकिल व त्याची अशील हे सेक्स करत होते. त्यांचा हा भयंकर प्रताप न्यायधीशापासून सर्वजण पाहात होते.
पेरू देशातील सॅगांडा गावात हा प्रकार घडला आहे. सदर सुनावणीची लिंक शेअर झाल्यावर सर्वांनी त्यावरून लॉग इन केले. सुनावणी सुरू झाली. बराच वेळ कामकाज झाल्यानंतर न्यायधीशांनी ब्रेक घ्यायचे ठरवले. हा ब्रेक घेतल्यानंतर वकिलाला त्याने कॅमेरा बंद केला असे वाटले त्यामुळे तो व त्याची अशील हे सेक्स करू लागले. मात्र त्यांचा कॅमेरा बंद झालेला नव्हता.त्यावेळी जे जे कुणी ऑनलाईन होते. त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसला. काहींनी फोन करून त्याबाबत वकिलाला कळविण्याचा प्रयत्न केला. मात्र नको त्या प्रकारात गुंतलेल्या त्या वकिलाने कुणाचेही फोन उचलले नाहीत. त्यामुळे अखेर न्यायधीशांनी सुनावणी थांबवून लॉग ऑऊट करण्याचा मार्ग स्वीकारला.







