मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे खुलासा करत सर्व आरोप फेटाळले आहेत. “करुणा शर्मा यांच्याबाबतीत यापूर्वीच खुलासा केला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. माझ्यावर केले जाणारे आरोप निव्वळ बदनामी करण्याचा हेतून केले असून यात काहीही तथ्य नाही”, असे धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
खुलासा करताना धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे की, “करुणा शर्मा यांच्या संदर्भातील वादासंदर्भात मी स्वतः उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती न्यायालयातील केली. त्यामध्ये उच्च न्यायालयात मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणून नियुक्तदेखील केली आहे”, असे स्पष्टीकरण मुंडेनी दिलेले आहे.
“मेडिएशनच्या आतापर्यंत दोन बैठका झालेल्या आहेत. तसेच १३ फेब्रुवारी २०२१ या दिवशी पुढची बैठक निश्चित केलेली आहे. यामध्ये सर्व वादांवर चर्चा होणार आहे. ही मेडिएशन प्रक्रिया सुरू असताना मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे, त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे पक्षात काहीही रस रस नसून निव्वळ मीडिया ट्रायलचा चालवून बदनामी करणे, हाच हेतू यातून दिसून येत आहे”, असेही स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलेले आहे.







