न्यूड व्हिडीओ शूट करण्यासाठी अभिनेत्रीला धमकी

video-shoot-in-mobile

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – कोरोनामध्ये लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. सर्व क्षेत्रामध्ये या परिणाम पाहायला मिळाला. अनेक मजुरांनी तर आपल्या गावी जाणं पसंत केलं. अशात अडचणीच्या काळात मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रात आणि बॉलीवूडलाही आर्थिक चणचण सोसावी लागली.

यादरम्यान काम नसल्याने अनेक आत्महत्येच्याही बातम्या पाहायला मिळाल्या. अशातच मुंबईतील एका अभिनेत्रीचा फायदा घेऊन ब्लू फिल्म तयार करण्यात आल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. अभिनेत्री आर्थिक चणचणीतून जात असल्याने तिच्याकडून ब्लू फिल्म तयार करून घेण्यात आल्या. ऑडिशनसाठी बोलावून हे लोक सेक्स सीन करायला सांगत होते. याला नकार दिल्यानंतर सेटचा आणि सर्व शुटिंगचा खर्च देण्याची जबरदस्ती केली जात. तरीही नकार दिल्यास पोलिसात तक्रार करू अशी धमकी देऊन अभिनेत्रीकडून ब्लू फिल्म शूट करुन घेतल्याचे वृत्त समोर आलं आहे.

यादरम्यान धमकी देऊन अभिनेत्रीकडून अनेक ब्लू फिल्म तयार करुन घेतल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अद्याप पोलीस तक्रार करण्यात आली वा नाही याबाबत अधिक माहिती अद्याप हाती लागलेली नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here