केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पदार्थ दरवाढीचा विरोधात शहादा शिवसेनेची सायकल रॅली

shahada-sivsena

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शिवसेना पक्षाकडून केंद्र शासनाने पेट्रोलियम पदार्थांवर केलेली दरवाढ अन्याय कारक असून ती तात्काळ थांबवावी त्यासाठी सायकल रॅली काडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उधव ठाकरे यांच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा शिवसेना कार्यकर्त्यांनी शहादा शहरातून सायकल रॅली काडून केंद्र सरकार च्या पेट्रोल व डिझेल इंधनाच्या दरवाढी विरोधात आंदोलन केले अंतरराष्ट्रीय बाजारपेठ पेट्रोलियम पदार्थ च्या किमतीत कमी असताना ही पेट्रोल दर शंभरीकडे वाटचाल करीत आहे यामुळे दळणवळण महागणार असुन सर्व सामान्याचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

shivsena-andolan-in-shahada

अगोदरच जिवनाश्यक वस्तू च्या किमती वाढल्या असून सर्व सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. तरी केंद्र शासनाने पेट्रोलियम पदार्थावारील अतिरिक्त भार तात्काळ रदद करून पेट्रोल, डिझेल, व घरगुती गॅस यांच्या किमती सर्व सामान्याच्या आवाक्यात आणाव्यात असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here